काँग्रेसमध्ये फेरबदलाचे वारे, कामत लोकसभेच्या रिंगणात ?

January 7, 2014 5:22 PM0 commentsViews: 1056

gurudas kamant and rahul gandhi07 जानेवारी : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसनं फेरबदलाचे संकेत दिले आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियंका गांधींनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. आणि याबाबच चर्चा केली. याचाच एक भाग म्हणून काँग्रेसचे सरचिटणीस गुरुदास कामत यांनी पदाचा राजीनामा देण्याची तयारी दाखवलीय. मुंबईतून लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केलीय. गुरुदास कामतांनी सोनिया गांधींची भेट घेऊन आपली इच्छा व्यक्त केली.

काँग्रेसचे नेते शकील अहमद, दिग्विजय सिंग यांना लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरवण्याची तयारी काँग्रेसने केलीय. कारण, हे नेते स्वत:च्या मतदारसंघात निवडून येतील असा विश्वास काँग्रेसला आहे. म्हणून संपूर्ण संघटनेची पुर्नरचना करण्याचा विचार काँग्रेसने केलाय.

काँग्रेसमध्ये सरचिटणीस पदावर असलेल्या नेत्यांना निवडणुकीसाठी रिंगणात उतरवायचं आणि काही महत्त्वांच्या नेत्यांना पुन्हा पक्ष संघटनेत आणायचं त्यांच्याकडे सरचिटणीसपदासारखी जबाबदारी सोपवायची असा निर्णय काँग्रेसने घेतलाय. याबाबत येत्या 15 दिवसात अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं.

त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीसाठी राहुल गांधी यांनी पक्षाची सर्व सूत्र हाती घेतलीय. त्यांच्यासोबत प्रियंका गांधींही कामाला लागल्या आहेत. मात्र त्यांच्याकडे कोणती जबाबदारी असणार हे अजून स्पष्ट झालं नाही. पण प्रियंका गांधी देशभरात प्रचार करतील असे संकेत काँग्रेसमधून मिळत आहे.

close