सेना-भाजप युतीतला तणाव वाढला

February 21, 2009 5:57 AM0 commentsViews: 5

21 फेब्रुवारीनिवडणुकीच्या रणधुमाळीत राज्यात राजकीय समीकरण बदलत आहेत. सेना-राष्ट्रवादी काँग्रेस युतीसंबंधी सद्या जोरदार चर्चा चालू आहे. त्यामुळे भाजप – शिवसेनेतला तणाव दिवसेंदिवस वाढत चाललाय. मुंबईत झालेल्या सेना जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत आगामी निवडुकीबाबत चर्चा झाली. त्यात सेना आणि राष्ट्रवादीची युती झाली तर राज्यात दोघांचीही ताकद वाढेल असं अनेक सेना जिल्हाप्रमुखांना वाटतं असं समजतंय. तसंच या बैठकीत राज्यात भाजपबरोरची युती तोडली तर त्याचे काय परिणाम होतील यावरही चर्चा झाली. पण सेना वरिष्ठ नेत्यांनी ही सर्वसाधण बैठक असल्याचं सांगितलं. असं असलं तरी या बैठकीनंतर कोणतीही माहिती प्रसार माध्यमांना देण्यास जिल्हाप्रमुखांना मनाई करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर शिवसेनेला युती तोडायची असेल तर त्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असं आव्हान भाजप नेते गडकारींनी दिलं आहे. दोन पक्षांमध्ये युती ही दोघांच्या हिताकरिता होत असते. ह्या युतीचा फायदा भाजपला झाला आणि शिवसेनेलाही झाला. तरीही भाजप-शिवसेना स्वतंत्र पक्ष आहेत. शिवसेनेला युती तोडायची असेल तर तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण आता लवकरात लवकर निर्णय घ्यावा असं गडकरींनी सांगितलं. दोन दिवसांपूर्वी गोपीनाथ मुंडे यांनीही कोणत्याही राजकीय डिझास्टरसाठी भाजप सज्ज आहे असं म्हटलं होतं.

close