सलमानला वाचवण्याचा पोलिसांचा प्रयत्न

January 7, 2014 10:16 PM0 commentsViews: 1153

hit and run salman07 जानेवारी : हिट अँड रन प्रकरणी पोलीस अभिनेता सलमान खानला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून आलंय. या खटल्याला 12 वर्षं झाली. पण पोलिसांनी अजून साक्षीदारांची यादीच तयार केलेली नाही.

गेल्या सहा महिन्यांपासून हे प्रकरण मुंबई सेशन्स कोर्टात सुरू आहे. सुरुवातीला हा खटला सेशन्स कोर्टात चालवायचा की नाही यावर युक्तिवाद सुरू होता. यानंतर हा खटला नव्या सुरू करायचा की नाही याच्यावर युक्तिवाद झाला. गेले सहा महिने अनेक मुद्द्‌यांवर युक्तिवाद सुरू आहे. पण प्रत्यक्ष खटला मात्र सुरूच झालेला नाहीय. आजची सुनावणी पुन्हा लांबणीवर पडलीय. आता 21 जानेवारीला पुढची सुनावणी होणार आहे.

हिट अँन्ड रन प्रकरणी सलमान खानवर आयपीसी 304 ( 2) या कलमानुसार सदोष मनुष्यवधाचा खटला दाखल करण्यात आला. मुंबईत 2002 साली सलमाननं भरधाव गाडी चालवून झालेल्या अपघातात एक जण ठार तर तीन जखमी झाले होते. याप्रकरणी त्याच्यावरती रॅश ड्रायव्हींग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र यावेळी 304 (2) नुसार सदोष मनुष्यवधाचा आरोप ठेवण्यात आला नव्हता.  जुलै 2012 मध्ये मेट्रोपोलिटन मॅजिस्ट्रेटनं आज सलमानवर सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली खटला चालणार असल्याचं जाहीर केलं. या खटल्यात जर सलमान दोषी सिद्ध झाला तर त्याला जास्तीत जास्त 10 वर्षांची शिक्षा भोगावी लागणार आहे.

close