न्या. सौमित्र सेन यांना हटवण्यासाठी राज्यसभेचे खासदार सरसावले

February 21, 2009 6:21 AM0 commentsViews: 6

21 फेब्रुवारीकोलकाता हाय कोर्टातल्या मुख्य न्यायाधिशांना पदावरून काढून टाकण्यासाठी राज्यसभेचे खासदार पुढं आले आहेत. मुख्य न्यायाधीश सौमित्र सेन यांनी 1993 मध्ये 32 लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे. सौमित्र सेन यांना पदावरून हटवण्याच्या मागणीसाठी राज्यसभेच्या 58 सदस्यांनी अध्यक्षांकडे याचिका दाखल केली आहे. तेलगू देसम, डावे आणि संयुक्त जनता दलाच्या 58 खासदारांनी या संदर्भातल्या याचिकेवर सह्या केल्या आहेत. बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा सेन यांच्यावर आरोप आहे. याप्र्रकरणी सेन यांना काढून टाकावं असं पत्र सरन्यायाधीश के. जी. बालकृष्णन यांनीही गेल्या वर्षीच्या ऑगस्टमध्ये पंतप्रधानांना लिहिलं होतं. हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधिशांविरोधात महाभियोग खटला चालवून पदावरून दूर करता येतं. स्वतंत्र भारताच्या इतिहासातली ही दुसरी घटना आहे.

close