500 कोटींचा धूम-3

January 8, 2014 9:14 AM0 commentsViews: 1382

dhoom08 जानेवारी : बॉलिवूडच्या अनेक सिनेमांची सध्या कोटींची उड्डाणे भरतोय. आता पर्यंत 100-200 कोटींचा गल्ला गाठण्याची मर्यादा नुकताच रिलीज झालेल्या धूम -3 ओलांडली आहे.
या सिनेमाने आत्तापर्यंत 500 कोटींचा गल्ला जमवला आहे. आमिर खानची प्रमुख भूमिका असलेल्या ऍक्शनपट धूम 3 ने तब्बल 500 कोटी रूपयांची कमाई करून बॉलिवूडमध्ये एक नवीन विक्रम केला आहे.

आमिर खान, अभिषेक बच्चन, उदय चोप्रा आणि कतरिना कैफ यांची प्रमुख भूमिका असणार्‍या धूम 3ने भारतात 351 कोटी 29 लाख रुपये तर परदेशात 150 कोटी 6 लाख रुपयांची कमाई केली.
बॉलिवूडमध्ये आत्तापर्यंत सर्वाधिक कमाई करणार्‍या सिनेमाचा विक्रम शाहरूख खान आणि दीपिका पादुकोणच्या ‘चेन्नई एक्सप्रेस’च्या नावी होता. पण आता आमिरने शाहरूखलाही मागे टाकून धूम -3 ने नवीन इतिहास घडवला आहे.

close