‘कोलगेट’ : आणखी दोन कंपन्यांवर गुन्हा दाखल

January 8, 2014 11:45 AM0 commentsViews: 231

Image img_215862_maharashtracoalscam_240x180.jpg08 जानेवारी : एनडीए सरकारच्या काळात झालेल्या कोळसा खाण वाटप घोटाळा प्रकरणी सीबीआयने आणखी दोन कंपन्यांवर गुन्हा दाखल केला आहे आणि कोळसा खाण वाटप झालेल्या चार ठिकाणी छापे टाकले.
बीएलए इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड आणि गॅस्ट्रोन टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड या दोन कंपन्यांचा यात समावेश आहे. तसंच अज्ञात अधिकार्‍यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही कंपन्यांना जेव्हा कंत्राट देण्यात आलं तेव्हा दिलीप रे आणि करिया मुंडा हे कोळसा मंत्री होते. पण गुन्हा दाखल करताना त्यात दोन्ही माजी मंत्र्यांचा उल्लेख करण्यात आलेला नाही.

close