तामिळनाडूत दिसताक्षणी गोळी घालण्याचे आदेश

February 21, 2009 4:22 AM0 commentsViews: 2

21 फेब्रुवारी चेन्नईसार्वजनिक संपत्तीचं नुकसान करणा-यांना दिसताक्षणीच गोळ्या घालण्याचे आदेश रात्री तामिळनाडूच्या पोलीस महासंचालकांनी दिले आहेत. चेन्नई हाय कोर्टाच्या आवारात वकील आणि पोलीस यांच्यात गुरुवारी चकमक झाली होती. शुक्रवारीही हा हिंसाचार सुरूच होता. जनता पार्टीचे अध्यक्ष सुब्रमण्यम स्वामी यांच्यावर दगडफेक केल्याच्या आरोपावरून एका वकिलाला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याविरोधात निदर्शन करणा-या वकिलांवर पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर परिस्थिती चिघळली. श्रीलंकेच्या मुद्यावरून वकिलांनी स्वामी यांच्यावर न्यायाधीशांच्या समोरच हल्ला केला होता. वकिलांनी काढलेल्या मोर्चावर पोलिसांनी लाठीमार केल्याचा आरोप आहे. या लाठीमारात अनेक वकील जखमी झाले होते. त्यामुळे चिडलेल्या वकिलांनी पोलीस स्टेशन पेटवून दिलं होतं. त्याचबरोबर एक फायर ब्रिगेडची जीपही पेटवून दिली. या घटनेची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश आता चेन्नई हायकोर्टाच्या न्यायाधीशांनी दिलेत. दरम्यान या हिंसाचाराचे पडसाद तामिळनाडूच्या विधानसभेतही उमटले.

close