अमेरिका गोठली

January 8, 2014 5:55 PM0 commentsViews: 1874

गेल्या 100 वर्षातल्या सगळ्यात जास्त थंडीने अमेरिकेचं इस्ट कोस्ट सध्या गारठलंय. उत्तर ध्रुवावरून येणार्‍या थंड वार्‍यांमुळे आलेल्या भयाण थंडीमुळे अमेरिकेत 16 बळी गेले आहे. पारा शुन्याखाली 14 ते 19 अशांपर्यंत घसरलेला आहे. न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्कमध्ये मंगळवारी उणे 16 तापमान नोंदवण्यात आल्यानंतर आता शहरात आणीबाणी जाहीर करण्यात आलीय. ही थंडी अशीच सुरू राहणार असल्याने नागरिकांनी घरातून बाहेर पडू नये अशा सुचना अमेरिकन सरकारकडून देण्यात येत आहे. या थंडीच्या लाटेचा परिणाम हवाई, रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर झालेला आहे. आतापर्यंत 2500 फ्लाईट्स कॅन्सल झाल्यात तर रेल्वे सेवा थांबल्याने शिकागोकडे जाणार्‍या ऍमट्रॅक ट्रेन्समध्ये 500 प्रवासी अडकलेले आहेत.

close