ठाणे भाजपमधला वाद : पक्षानं समिती नेमली

January 9, 2014 10:34 AM0 commentsViews: 515

INDIA-VOTE-ELECTIONS-NAIK09 जानेवारी : ठाण्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासूून भाजपमध्येअंतर्गत वाद सुरू आहे. यावर तोडगा काढण्यासाठी आणि दोषी नेत्यांना शोधण्यासाठी भाजपनं ज्येष्ठ नेते राम नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली एक समिती नेमलीय. ही समिती 10 ते 12 दिवसात आपला अहवाल देईल. त्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष देंवेंद्र फडणवीस यांनी दिलीय. रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेच्या निमित्ताने फडणवीस ठाण्यात आले होते.

ठाणे महानगरपालिकेतील परिवहन समितीच्या निवडणुकीत वाद झाला होता. शिवसेनेतून बंडखोरी करून आघाडीच्या गळाला लागलेले उमेदवार शैलेश भगत यांचा विजय झाला. या निवडणुकीत भाजपचे अजय जोशी यांनी आघाडीला मतदान केल्यामुळे आधीच तापलेल्या वादात भर पडली आणि त्याचा परिणाम मारहाणीत झाला. याप्रकरणी नाराज झालेल्या शिवसेना नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी भाजपचे ठाण्याचे शहराध्यक्ष मिलिंद पाटणकर यांना बेदम मारहाण केली आणि डांबूनही ठेवलं. या प्रकारानंतर उपमहापौर पाटणकर यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर मिलिंद पाटणकर यांना धमक्या आल्यामुळे ते तब्बल 12 दिवस नॉट रिचेबल झाले होते. इतकंच नाही तर दबावाखाली राजीनामा दिल्याचा गौप्यस्फोटही पाटणकरांनी केला आहे.

close