शाळेत मोबाइल वापरावर बंदी

February 21, 2009 10:54 AM0 commentsViews: 3

21 फेब्रुवारी मुंबईशाळेचा परिसर आणि वर्गात शिक्षक आणि विद्यार्थ्यांना मोबाईल वापरायला बंदी घालण्यात आली आहे. शिक्षण विभागानं तशा सूचना दिल्या आहेत. अनेक शिक्षक वर्गात मोबाईलचा वापर करतात. त्यामुळे शिकवण्यात अडथळा निर्माण होतो. तसंच विद्यार्थ्यांचं लक्षही विचलीत होतं. शिवाय वर्गातला वेळही वाया जातो. त्यामुळे शाळेत मोबाईल बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची अमंलबजावणी तात्काळ करण्यात येईल असंही राज्य सरकाने सांगितलं आहे. शिक्षकाबद्दल अनेक तक्रारी आल्यामुळे सरकारने ही कारवाई केली असं सांगण्यात येतं. शिक्षक वर्ग चालू असताना फोनवर बोलत असतात. त्यामुळे शिकवण्याच्या कामाला वेळ कमी मिळतो. तसंच मोबाइल असणं हा मुलांमध्ये नवीन ट्रेण्ड आलेला आहे. मुलांच्या सुरक्षिततेसाठी अनेक पालक आपल्या मुलांना मोबाइल देत होते. पण मुलं त्याचा गैरवापर करताना आढळले. यामुळे आता लवकरच शाळांमध्ये मोबाइल बंदीचा आदेश लागू करण्यात येणार आहे.

close