मेधा पाटकर आम आदमी पार्टीत?

January 9, 2014 2:20 PM0 commentsViews: 1322

Image img_191942_medhaonhiranandani3_240x180.jpg09 जानेवारी : आम आदमी पार्टीकडे मान्यवरांचा ओढा वाढतच चालला आहे. सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकरसुद्धा आम आदमी पार्टीत जाण्याची शक्यता आहे. अधिकृतपणे पक्षात प्रवेश करायचा की केवळ पाठिंबा द्यावा, यासंदर्भात सध्या जनआंदोलन समितीत चर्चा सुरू असल्याचं जनआंदोलन समितीच्या नेत्या मेधा पाटकर यांनी IBN लोकमतशी बोलताना सांगितलं आहे.

“आम्ही जनआंदेलनात चर्चा करत आहोत आणि ‘आप’सोबत जावं की पाठिंबा द्यावा, याबाबत सध्या बोलणी सुरू आहे. मात्र अजून कोणताही निर्णय झालेला नाही.” आम आदमी पार्टीचे नेते योगेंद्र यादव यांनी मेधा पाटकरांची भेट घेऊन त्यांना ‘आप’मध्ये सहभागी होण्याची विनंती केलीय. त्यापार्श्वभूमीवर मेधा पाटकरांनी IBN लोकमतशी बातचीत केली.

close