अमेरिका उणे 30

January 9, 2014 5:41 PM0 commentsViews: 1756


09 जानेवारी : अमेरिकेला थंडीपासून थोडा दिलासा मिळाला आहे. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेत आता थंडीचा धोका टळलाय आणि येत्या काही दिवसात तापमानात वाढ होईल. कालपर्यंत उणे 50 अंश सेल्सिअस तापमान असणार्‍या मिनेसोटा भागात आज पारा उणे 30 अंश सेल्सिअसवर पोचलाय. लवकरच पारा शून्य अंशाच्या वर येईल, अशी आशा आहे. या कडाक्याच्या थंडीनं अमेरिकेत आतापर्यंत 21 जणांचे बळी घेतले आहे.

close