सचिन तेंडुलकर चौक

January 9, 2014 3:08 PM0 commentsViews: 586

09 जानेवारी : मुंबई-गोवा महामार्गावर प्रवास करणार्‍यांना भारतरत्न सचिन तेंडुलकर चौक नजरेस पडणार आहे. सिंधुदुर्गातल्या कासार्डे विजयदुर्ग फाट्यावर हा चौक उभारण्यात आलाय. कणकवलीचे भाजप आमदार प्रमोद जठार यांनी हा चौक उभारून एक आगळीवेगळी सलामी सचिनला दिलीय. या महान खेळाडूची प्रेरणा सतत तरूणांना मिळावी, कोकणवासीयांना सचिनचा अभिमान वाटावा, या हेतूनंच हा चौक उभारण्यात आलाय.