दाऊद गँग पुन्हा मुंबईत सक्रिय ?

January 9, 2014 7:18 PM1 commentViews: 1638


सुधाकर काश्यप, मुंबई

09 जानेवारी : दाऊद गँगचा गँगस्टर तारीक परवीन हा पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात सक्रिय झालाय. जागा बळकावणे, धमकी देणे, मारहाण करणे अशा अनेक तक्रारी त्याच्या विरोधात दाखल होत आहे. इतकंच नाही तर तारीक याच्या कारवाया तात्काळ रोखाव्यात त्याच्यावर कडक कारवाई करावी, अशी तक्रार राज्याचे पर्यावरण आणि सांस्कृतिककार्य मंत्री संजय देवतळे यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे केलीय.

अबुबकार खान यांचं क्रॉफर्ड मार्केटमधल्या अशोका शॉपिंग सेंटरमध्ये दुकान आहे. याच सेंटरच्या कमिटीचे ते पदाधिकारीही होते. या शॉपिंग सेंटरशी कोणताही संबंध नसताना गँगस्टर तारीक परवीनचा इथं वावर असतो. परवीन आणि त्याच्या साथीदारांच्या गाड्या शॉपिंग सेंटरच्या आवारात बेकादेशीरपणे पार्क केलेल्या असतात. याला आक्षेप घेतल्यानंतर अबुबकार आणि त्यांच्या भावाला बेदम मारहाण करण्यात आली.

तारीक परवीन हा दाऊद गँगचा गँगस्टर आहे आणि त्याच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. सहारा-सारा शॉपिंगची जागा बळकावल्याचा ही त्याच्यावर आरोप होता. मोक्का कायद्यांतर्गत त्याला पाच वर्ष शिक्षा ही झाली. अशोका शॉपिंग सेंटर हे पोलीस आयुक्त कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर आहे. अबुबकार यांनी या प्रकरणाची संजय देवतळे यांच्याकडे तक्रार केली होती. यामुळे गँगस्टर तारीक परवीन याच्यावर त्वरिक कडक कारवाई करण्यासाठी देवतळे यांनी तक्रार करुन कायदा सुव्यवस्थे बद्दल प्रश्न निर्माण केलाय

पोलीस मात्र, या प्रकरणात योग्य कारवाई केल्याचा दावा करत आहेत. तारीक परवीन याच्या अधिक कारवाई करणार असल्याचे परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी सांगितलं.

पोलीस तारीक परवीन आणि त्याच्या साथिदारांना वाचवण्यासाठी प्रयत्न करतायत, त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून तो जामिनावर बाहेर आहे, हे जामीन रद्द व्हायला हवेत त्यामुळे हा गँगस्टर जास्त सक्रीय होत असल्याचं अबूबकार यांचं म्हणणं आहे.

  • Anant Jadhav

    दाऊद पुन्हा मुंबईत सक्रिय !
    – दाऊद गँगचा गँगस्टर तारीक परवीनचा उच्छाद वाढला !

close