मालेगाव प्रकरणी श्रीराम सेनेच्या सरचिटणीसाची चौकशी

February 21, 2009 4:00 PM0 commentsViews: 5

21 फेब्रुवारी मालेगाव बॉम्बस्फोटात सहभाग असल्याच्या संशयावरून श्रीराम सेनेच्या बेळगाव इथला राज्य सरचिटणीस विलास पवार यांची मुंबई एटीएसकडून चौकशी करण्यात आली. काही दिवसांपूर्वीच श्रीरामसेनेचे अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांचीही एटीएसकडून चौकशी करण्यात आली होती. आयबीएन लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार एटीएसला आवश्यक असणा-या एका आरोपीच्या शोधासाठी ही चौकशी करण्यात आली. बेळगावातल्या जिल्हा पोलीस मुख्यालयात ही चौकशी करण्यात आली आहे. दरम्यान, मालेगाव स्फोटाशी आपला काहीही संबंध नसल्याचं विलास पवार यांचं म्हणणं आहे.

close