‘आप’चा जनता दरबार रस्त्यावरच !

January 9, 2014 9:49 PM1 commentViews: 1009

weqrq aap darbar09 जानेवारी : भ्रष्ट अधिकार्‍यांना वठणीवर आणण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी एक हेल्पलाईन सुरू केली. आज आणखी एक पाऊल पुढे टाकत केजरीवाल यांनी लोकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी जनता दरबार घेणार असल्याची घोषणा केलीय. पुढच्या आठवड्यापासून दर शनिवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांचं संपूर्ण मंत्रिमंडळ मंत्रालयाबाहेर जनता दरबार भरवतील.

कुणालाही कुठल्याही आडकाठीशिवाय या जनता दरबारात येता यावं, यासाठी रस्त्यावरच हा दरबार भरवला जाणार आहे. शनिवारी अख्ख मंत्रिमंडळ उपस्थित असेल. उरलेल्या दिवशी रोज एक मंत्री हा जनता दरबार भरवेल आणि लोकांच्या समस्यांचं प्रकरणाच्या गांभीर्यानुसार वर्गीकरण करून त्या सोडवल्या जातील.

दरम्यान, ‘आप’नं सुरू केलेल्या भ्रष्टाचारविरोधी हेल्पलाईनलाही भरघोस प्रतिसाद मिळतोय. आज पहिल्याच दिवशी दुपारी तीन वाजेपर्यंत तब्बल 3000 लोकांनी या हेल्पलाईनवर कॉल केला. त्यातल्या 700 जणांच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या. लोकांचा हा प्रतिसाद बघून हेल्पलाईनसाठीच्या कर्मचार्‍यांची संख्या दुप्पट करणार असल्याचं मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सांगितलंय. भ्रष्ट अधिकार्‍यांना रंगेहाथ पकडून देण्यासाठी काय करता येईल, यासाठी या हेल्पलाईनवरून मार्गदर्शन करण्यात येतं.

  • Sameer Birje

    Very Good

close