देवयानी खोब्रागडे मायदेशी परतणार;आरोप कायम

January 10, 2014 9:34 AM0 commentsViews: 641

devyani k10 जानेवारी : भारतीय राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे यांच्यापुढचा भारतात परतण्याचा मार्ग आता मोकळा झालाय.त्यांना संपूर्णपणे राजनैतिक संरक्षण देण्यात आलंय. व्हिसासाठी चुकीची माहिती दिल्याचा आणि मोलकरणीचं आर्थिक शोषण केल्याच्या आरोपावरून त्यांना अमेरिकेत अटकही झाली होती. देवयानी यांच्यावरचे दोन ठपके मात्र अमेरिकेकी कोर्टानं कायम ठेवलंत.पण, संपूर्ण राजनैतिक संरक्षण बहाल करण्यात आल्यामुळे त्यांना अमेरिका सोडण्यास परवानगी देण्यात आली आहे.

अमेरिकेनं देवयानी यांना जी-1 व्हिसा दिलाय, जी-1 व्हिसा संपूर्ण राजनैतिक संरक्षण असलेल्या व्यक्तींसाठी असतो. त्यापूर्वी राजनैतिक संरक्षण काढून घेण्याची अमेरिकेची विनंती भारताने फेटाळली होती. मात्र, अमेरिकी मीडियानं दिलेल्या बातम्यांनुसार, देवयानी खोब्रागडे यांचंराजनैतिक संरक्षण काढून घ्या नाहीतर त्यांना भारतात परत बोलवा असं अमेरिकेनं भारताला सांगितलं होतं. मात्र, असं काहीही घडलं नाही असा दावा देवयानी यांच्या वकिलांनी केला आहे.देवयानी खोब्रागडे यांच्यावर अमेरिकेतल्या कोर्टांनी व्हिसामध्ये फसवणूक करणे आणि घरकाम करणार्‍या महिलेला अमेरिकेला नेताना चुकीची माहिती देणे या दोन गोष्टींसाठी त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.

12 डिसेंबर 2012 रोजी देवयानी खोब्रागडे यांच्यावर अमेरिकेतल्या कोर्टांनी व्हिसामध्ये फसवणूक प्रकरणी अटक करण्यात आली होती. या प्रकरणी अमेरिकेतील फेडरल कोर्टात शुक्रवारी सुनावणी झाली. कोर्टाने देवयानी खोब्रागडेंना व्हिसा घोटाळा व कोर्टासमोर खोटी माहिती दिल्याबद्दल दोषी ठरवत त्यांच्यावर खटला चालवण्यास परवनागी दिली. मात्र देवयानी यांना राजनैतिक संरक्षण मिळाले असून त्या अमेरिकेत नसल्याची माहिती सरकारी वकिल प्रीत भरारा यांनी कोर्टाला दिली. देवयानी आता अमेरिकेत नसल्याने त्यांच्यावरील हा खटला प्रलंबित राहिल. त्यांचे राजनैतिक अधिकार रद्द झाल्यावरच त्यांना पुन्हा कोर्टासमोर हजर करता येईल असे पत्र भरारा यांनी कोर्टाला दिल्याचे समजते.

close