नाशिकमध्ये भाजप विरुद्ध मनसे संघर्ष शिगेला

January 10, 2014 12:25 PM0 commentsViews: 3331

raj modi10 जानेवारी :  भाजप विरूध्द मनसे संघर्ष नाशिकमध्ये चिघळला आहे. नाशिकमध्ये शनिवारी होत असणार्‍या विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमांवर भाजपने बहिष्कार घातला आहे. काल राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेमुळे भाजप नेते नाराज झाले आहेत.

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर होताच नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला हवा होता. पंतप्रधान देशाचा असावा, तो राज्याचा असू नये असं मत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केलं होतं. त्यावर नाशिकमधल्या भाजपच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. नाशिकमध्ये यापुढे मनसेला सहकार्य करणार नाही, अशी भूमिका भाजपने घेतली आहे. नाशिक महापालिकेत सध्या मनसे-भाजपची एकत्रित सत्ता आहे.

दरम्यान कोणत्याही परिस्थितीत हे उद्घाटन होणारच, असा पवित्रा मनसेने घेतला आहे. हा शहर विकासासाठी महत्वाचा प्रश्न आहे. भाजपला आम्ही निमंत्रण दिलं होतं, असं मनसे प्रदेश सरचिटणीस, आमदार वसंत गीते यांनी म्हटलं आहे.

close