‘आप’चं लक्ष्य 1 कोटी सदस्यांचं – केजरीवाल

January 10, 2014 2:08 PM0 commentsViews: 670

cm kejrival delhi10 जानेवारी : 26 जानेवारीपर्यंत 1 कोटी सदस्यांची नोंदणी करण्याचं आम आदमी पार्टीचं लक्ष्य आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज ही माहिती दिली. आम आदमी पार्टीच्या सदस्य नोंदणी मोहिमेला आजपासून सुरुवात झाली आहे. ‘मैं भी आम आदमी’ या नावानं ही मोहीम राबवण्यात येत आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत पाच लाख सदस्यांची नोंद झाली असून ‘आप’च्या सदस्य नोंदणी मोहिमेला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे केजरीवाल यांनी म्हटलं आहे. मेधा पाटकर या ‘आप’च्या सदस्य होणार आहेत का, याबद्दल अजून माहिती नसल्याचंही ते म्हणाले.

close