गुजरातच्या पोलीस महासंचालकांची बदली

February 22, 2009 7:22 AM0 commentsViews: 1

22 फेब्रुवारी, गुजरात गुजरातमध्ये न्यायाचं चक्र सहा वर्षानं का होईना पण फिरू लागलं आहे. आता गुजरातचे पोलीस महासंचालक पी.सी.पांडे यांची बदली करण्यात आलीय.त्यांच्या जागी एस.एस. खांडवावाला या मुस्लीम अधिकार्‍याची नेमणूक मोदींनी केलीये. गोध्रा हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी सुप्रीम कोर्टानं एका विशेष पथकाची नेमणूक केलीय. पी. सी. पांडे हे गोध्रा हत्याकांडावेळी अहमदाबाद पोलीस आयुक्तपदी कार्यरत होते. गोध्रा हत्याकांडानंतर अहमदाबादमध्ये भीषण दंगल झाली. अनेक लोक मारले गेले. त्यावेळी अहमदाबादचे पोलीस कमिशनर असलेल्या पांडे यांना जबाबदार धरुन कारवाई झाली नव्हती. पण आता ती होण्याची शक्यता आहे. याप्रकरणी आता त्यांचीही चौकशी होणार आहे. त्यामुळेच त्यांची बदली करण्यात आलीय.

close