मनसेशी काडीमोड घ्या,नाशिक भाजपचा प्रस्ताव

January 10, 2014 6:41 PM2 commentsViews: 1346

Image mns_and_bjp_300x255.jpg10 जानेवारी : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेमुळे भाजप नेते दुखावले गेले आहे. त्यामुळे नाशिकमध्ये मनसेशी काडीमोड घ्या असा प्रस्ताव नाशिक भाजपने दिला आहे. प्रदेश भाजपकडे हा प्रस्ताव देण्यात आलाय. हा प्रस्ताव मिळाला असून यावर चर्चा सुरू आहे आणि लवकरच निर्णय घेतला जाईल अशी माहिती भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी दिली.

“नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाची उमेदवारी जाहीर झाल्यावर त्यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला हवा होता, पंतप्रधानपदाचा उमेदवार असणार्‍या व्यक्तीने फक्त आपल्या राज्यापुरता विचार करणं योग्य नाही” अशी टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी केली होती. राज यांच्या टीकेमुळे भाजपने नेत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. आजही याचे पडसाद उमटत आहे. नाशिकमध्ये भाजप आणि मनसे यांची युती असून राज यांनी नरेंद्र मोदींवर टीका केल्यामुळे भाजपने संताप व्यक्त केलाय. आज भाजपने आक्रमक भूमिका घेत मनसेवर हल्लाोबाल केलाय.

महापालिकेच्या कारभारात मनसेची भुमिका दुटप्पी असून मनसेची कामगिरी समाधानकारक नाही, असा आरोप यानिमित्ताने भाजपने केलाय. एवढंच नाही तर राज ठाकरेंच्या उपस्थितीत 400 कोटी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ होतोय. त्यावर भाजपनं बहिष्कार टाकलाय. आता तर मनसेशी काडीमोड घ्या असा प्रस्तावच नाशिक भाजपने दिलाय.

भाजप प्रवक्ते माधव भांडारी यांनी आयबीएन लोकमतकडे या बातमीला दुजोरा दिला. राज यांनी नरेंद्र मोदींवर जी टीका केली त्यामुळे नाशिकमध्ये भाजप कार्यकर्ते संतप्त आहे, मनसेचा मनमानी कारभाराबद्दलही त्यांनी तक्रार केलीय आहे. त्यामुळे यावर गांभीर्याने चर्चा सुरू आहे यावर लवकरच निर्णय घेतला जाईल असं भांडारी यांनी स्पष्ट केलं. नाशिक पालिकेत एकूण 110 जागांपैकी मनसेचे 40 नगरसेवक आहे तर भाजपचे 14 नगरसेवक आहे.

मनसे आणि भाजपने युतीकरुन दोनवर्षांपूर्वी सत्ता स्थापन केली. मोदींवर टीका केल्यामुळे गेल्या दोन वर्ष नाशिकमध्ये मनसे आणि भाजपमध्ये सुरू असलेली धुसफूस उघड झालीय. आता तर भाजपने काडीमोड घेण्याची मागणी केल्यामुळे मनसेसाठी धोक्याची घंटा आहे. यावर राज ठाकरे काय भूमिका घेतात हे महत्त्वाचे ठरणार आहे.

  • Pankaj

    BJP aata jast havet udat aahe. Mala pan vatat hoto hya vote for modi pan je aaj ghadtay tyamule hya veli no vote for modi. Gujrathi mata Saathi marathi mansana BJP ne dhukvla aahe. Me my Family full support to Raj Thakarey n ShivSena not for BJP

  • MrShekhargawde .

    just declaring Modi’s name as PM candidate doesnt necessarily means he has to resign as CM. Once he becomes PM he can decide if he can manage both the post or need to resign from one.MNS is just the vote spoiler for SS and BJP. I was also a supporter of MNS but not this time.

close