24 फेब्रुवारीपर्यंत तामिळनाडू कोर्टाचं कामकाज बंद

February 22, 2009 7:20 AM0 commentsViews: 6

22 फेब्रुवारीयेत्या 24 फेब्रुवारीपर्यंत तामिळनाडू आणि पाँडिचेरीतल्या कोर्टाचं कामकाज बंद राहणार आहेत असा आदेश मद्रास हायकोर्टानं दिलाय. तसंच गुरूवारी वकिलांवर लाठीमार करण्याचा आदेश कुणी दिला असा सवाल, हायकोर्टानं पोलीस महासंचालकांना केला आहे. दोन दिवसांपूर्वी मद्रास कोर्टात पोलीस आणि वकिलांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली होती. वकिलांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ शुक्रवारी दिवसभर तामिळनाडूमध्ये ठिकठिकाणी निदर्शनं करण्यात आली होती. दरम्यान, वकील आणि पोलिसांच्या हाणामारीमुळे हायकोर्टाच्या मालमत्तेचं जे नुकसान झालंय, त्याबाबत सरकारनं कुठलाही आदेश का काढला नाही, अशी विचारणाही हायकोर्टानं केलीय. आता यानंतर न्यायालयाच्या आवारात असा प्रकार घडू नये, म्हणून हिंसा करणा-यांना जागीच गोळ्या घाला असे आदेश न्यायालयानं सरकारला दिले आहेत.

close