शरद पवार पंतप्रधान झाल्यास आनंदच -शिंदे

January 11, 2014 4:03 PM0 commentsViews: 1392

shinde pawar11 जानेवारी : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींना पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित करण्याची तयारी काँग्रेसमध्ये सुरू आहे. त्याचवेळी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी एक वक्तव्य करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पंतप्रधान झाले तर आपल्याला आनंद होईल, असं सुशीलककुमार शिंदे यांनी म्हटलंय. केवळ दिल्लीच्या राजकारणामुळेच पवार पंतप्रधान होऊ शकले नाहीत, असंही त्यांनी म्हटलं आहे. शुक्रवारीच शिंदे यांनी राहुल गांधींना पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करावं, अशी पक्षात सर्वांचीच मागणी असल्याचं म्हटलं होतं.

त्या पार्श्वभूमीवर दुसर्‍या दिवशी शिंदे यांनी आपला कौल पवारांना दिलाय. सोलापुरात ते बोलत होते. शिंदे यांनी पवारांचं नाव पुढं केल्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होतं आहे. मात्र शरद पवार यांनी आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाहीत असं अगोदरच जाहीर केलंय.

close