‘रणजी’त महाराष्ट्र सेमीफायनलमध्ये, मुंबईचा गेमओव्हर

January 11, 2014 2:41 PM0 commentsViews: 1066

mh win11 जानेवारी : रणजी क्रिकेट स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्ये महाराष्ट्राने बलाढ्य मुंबईवर मात करत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. रणजी स्पर्धेच्या इतिहासात महाराष्ट्राने मुंबईवर चौथ्यांदा मात केली आहे. महाराष्ट्रासमोर विजयासाठी 252 रन्सचं आव्हान होतं.

केदार जाधव आणि विजय झोलच्या दमदार बॅटिंगच्या जोरावर विजयाचे हे आव्हान महाराष्ट्राने 8 विकेट राखून पार केलं. केदार जाधवने अवघ्या 144 बॉलमध्ये नॉटआऊट 120 रन्सची धडाकेबाज मॅचविनिंग खेळी केली.

यात त्याने 14 फोर आणि 3 सिक्सही मारले. तर जबरदस्त फॉर्मात असलेला युवा बॅट्समन विजय झोलनं नॉटआऊट 91 रन्स करत केदार जाधवला मोलाची साथ दिली. झोलनं 13 फोरची बरसात केली.

close