कसाबवर कारवाई होणार भारतातच – पाक संरक्षणमंत्री

February 22, 2009 7:52 AM0 commentsViews: 6

22 फेब्रुवारी आधी पाक सरकार कसाबला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी करत होतं. पण आता ' मुंबई हल्ल्यातला अतिरेकी अजमल कसाब याला ताब्यात द्या अशी मागणी पाकिस्तान करणार नाही, ' असं पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी म्हटलं आहे. कसाबनं भारतात जाऊन गुन्हा केलाय. त्यामुळं त्याच्यावर भारतातच खटला चालेल, अशी भूमिका आता पाकिस्ताननं घेतलीय.पाकिस्तानात असलेल्या व्यक्तींवरच पाकिस्तानात खटला चालवला जाईल, असं स्पष्टीकरणही त्यांनी दिलंय.

close