हातेकरांनी घेतली राज्यपालांची भेट

January 11, 2014 8:26 PM0 commentsViews: 306

neeraj hatekar 411 जानेवारी : प्राध्यापक डॉ.नीरज हातेकर यांनी आज कुलगुरु राजन वेळूकरयांनी केलेल्या निलंबनाच्या कारवाईविरोधात राज्यपाल के.शंकर नारायणन यांची भेट घेतली. यावेळी हातेकरांसोबत विद्यार्थ्यांनीही राज्यपालांची भेट घेतली.

हातेकरांच्या पाठिंब्यासाठी विद्यार्थ्यांनी सह्यांची मोहीम राबवली होती. हातेकरांना विद्यापीठात परत आणा या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी केलेल्या सह्या राज्यपालांकडे सादर केल्या. लोकभारतीचे अध्यक्ष आणि आमदार कपिल पाटील हेदेखील हातेकरांसोबत होते.

दरम्यान, हातेकर यांना आता काँग्रेसनंही पाठिंबा दिला आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष प्रा. जनार्दन चांदूरकर यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र लिहून या प्रकरणात हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे.

close