कोल्हापुरात टोलविरोधी उपोषण मागे

January 11, 2014 9:37 PM1 commentViews: 1258

kolhapur11 जानेवारी : कोल्हापूरमध्ये गेल्या 6 दिवसांपासून सुरू असलेलं बेमुदत उपोषण अखेर मागे घेण्यात आलंय. गृहराज्यमंत्री सतेज पाटील आणि कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेल्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आलं. गेल्या 6 दिवसांपासून टोलविरोधी कृती समितीच्या 12 कार्यकर्त्यांनी बेमुदत उपोषण सुरू केलं होतं. नारळ पाणी घेऊन कार्यकर्त्यांनी उपोषण सोडलं.

सरकारने दखल न घेतल्याने शनिवारी दुपारपासून शेकापचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक एन.डी पाटील यांनीही उपोषण सुरू केलं होतं मात्र त्यानंतर कोल्हापूरच्या दोन्ही मंत्र्यांनी नगरसेवकांसोबत बैठक घेऊन उपोषणकर्त्यांची भेट घेतली आणि रस्ते विकास प्रकल्पाचे पुनर्मूल्यांकन करून आयआरबी कंपनीचे पैसे महापालिकेमार्फत पुरवले जातील असं आश्वासन दिलं.

या आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आलं. दरम्यान, गेल्या 2 तासांपासून कोल्हापूर शहरातल्या 9 टोल नाक्यांवरची वसुली बंद झाली आहे. त्यामुळे करवीरवासियांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. नागरिकांनी फटाके फोडून एकच जल्लोष केला.

  • Yogesh Borawake

    अभिनंदन हि तर महाराष्ट्राला दाखवलेली दिशा आहे.

close