धर्मनिरपेक्षता आणि जातीयवादाची युती अशक्य – विलासराव देशमुख

February 22, 2009 8:01 AM0 commentsViews: 1

22 फेब्रुवारी , कोल्हापूर राष्टवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची युती होणार की नाही, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. पण धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि जातीयवादी शिवसेना यांची युती होऊ शकत नाही आणि युती झाल्यास आम्हाला काही फरक पडत नाही, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी दिलीय. ते कोल्हापुरात बोलत होते. धर्मनिरपेक्षता आणि जातीयवादाची युती झाल्यास काँग्रेसपुढे त्यांचा मार्ग मोकळा होईल, असंही विलासरावांनी सांगितलं.

close