कोल्हापुरात टोल आंदोलन पुन्हा पेटलं!

January 12, 2014 1:40 PM1 commentViews: 1484

tolandolan12 जानेवारी : कोल्हापूरमध्ये टोलविरोधी आंदोलन पुन्हा चिघळलं आहे. मंत्र्यांच्या टोल बंदीच्या आश्वासनानंतरही आयआरबी कंपनीची टोलवसुली सुरुच असल्याने आंदोलकांनी फुलवाडी, शिरोलीसह 4 टोलनाके तोडफोड करून पेटवले. या दोन्ही टोलनाक्यांवर बुलडोझरन उद्‌ध्वस्त करून त्यांना जाळून टाकले. टोलविरोधात शिवसेनेने उद्या कोल्हापूर बंदची हाक दिली आहे.

कोल्हापूरमध्ये गेल्या तीन-चार वर्षांपासून टोलविरोधात जनआंदोलनाचा लढा उभारला जात आहे. कामगारमंत्री हसन मुश्रीफ आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी आयआरबीचे टोलचे सर्व पैसे महापालिकेकडून दिले जातील असं लेखी आश्‍वासन दिले होते. तरही आयआरबी कंपनीने आज सकाळपासून टोलवसुली सुरुच ठेवली. त्यामुळे संतप्त नागरिकांनी 4 टोलनाके आणि आयआरबी कंपनीचे कार्यालयही पेटवून दिले.

  • Dhiraj

    Nice work by ShivSena..

close