अमेठीत कुमार विश्वास यांना दाखवले काळे झेंडे

January 12, 2014 3:18 PM0 commentsViews: 543

vishwas kumar12 जानेवारी :  काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा मतदारसंघ असलेल्या अमेठीमध्ये आज आम आदमी पार्टीचे नेते कुमार विश्वास रॉली घेणार आहेत. पण त्याआधीच कुमार विश्वास यांना काळे झेंडे दाखवण्यात आले आहे. गेल्या अनेक दशकांपासून गांधी कुटुंबातलेच कोणी ना कोणी या मतदारसंघाचे संसदेत प्रतिनिधीत्व करत आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीत अमेठीमधून राहुल गांधी यांच्याविरोधात लढणार असल्याचे आम आदमी पक्षाच्या कुमार विश्वास यांनी यापूर्वीच जाहीर केले होत. त्या पार्श्वभूमीवर आज ते अमेठीत मोठी सभा घेणार आहेत. पण त्यापूर्वीच त्यांना काळे झेंडे दाखवून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी विश्वास यांच्या ताफ्यावर चपलाही करण्यात आली.

काल त्यांच्यावर समाजवादी पक्षाच्या कथित समर्थकाने अंडी फेकली होती. मात्र, अमेठीमधून निवडणूक लढवण्याचा आपला इरादा अगदी पक्का असल्याचं विश्वास यांनी सांगितले आहे.

close