‘राज ठाकरेंना निवडणुकीनंतर आजोबा आठवतील’

January 12, 2014 2:31 PM0 commentsViews: 1060

Image img_220842_vijaypandhare_240x180.jpg12 जानेवारी : आगामी निवडणुकीनंतर राज यांना त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे आठवतील, असा सणसणीत टोला आम आदमी पक्षाचे नेते विजय पांढरे यांनी दिली आहे.  त्याचबरोबर आगामी निवडणुकीत ‘आप’च्या कामगिरीनंतर राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह मनसेसारख्या प्रादेशिक पक्षांची बत्ती गुल होणार असल्याचा दावा करीत पांढरे विरोधी पक्षांवरही बरसले. ते पंढरपूर येथे बोलत होते.

मनसेच्या राज्यस्तरीय पदाधिकारी बैठकीसाठी नाशिकला आलेल्या राज ठाकरे यांनी गुरुवारी ‘महाराष्ट्रात आपची गरज नाही, आम्ही आहोत ना बाप’, असल्याची टीका केली होती . राज यांच्या टीकेनंतर ‘आप’च्या विविध नेत्यांनी राज यांना प्रत्युत्तर दिले. विजय पांढरेंनी शनिवारी झालेल्या आपच्या सभेत राज यांच्या या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला.

 

close