अहमदनगरमध्ये दरोडेखोरांचा गोळीबार, एक ठार

January 12, 2014 11:15 AM0 commentsViews: 68

karjat12 जानेवारी : कर्जत शहरात सोनारला लुटताना झालेल्या गोळीबारात एक जण ठार तर एक जण जखमी झाला. सायंकाळी साडे सातच्या सुमारास कर्जत शहराच्या बाजार तळावर ही घटना घडली. सुशांत कुलथे या सराफ व्यवसायिकाला लुटण्यासाठी आलेल्या दोघांनी हा गोळीबार केला. जखमी व्यक्तीला सिटी केअर हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

कर्जत शहरातील भर बाजारपेठेत आनंदी ज्वेलर्स हे दुकान बंद करून दागिने घेऊन संदीप कुलथे घरी जात असताना पल्सर गाडीवरून आलेल्या दोन दरोडेखोरांनी हातातील दागिन्यांची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. सुशांतने आणि त्याच्या मित्राने विरोध केला. तेव्हा अज्ञात दरोडेखोरांनी गोळीबार केला यात ज्योतीपाल घोडके हा जागीच ठार झाला तर सुशांतला चार गोळ्या लागल्या त्यावर अहमदनगरच्या सिटी केअर हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत.

या सगळ्या घटनेमुळे नागरीक देखील संतप्त होऊन शवविच्छेदन सुरू असताना रूग्णालयात दाखल झालेल्या पोलिस उपअदिक्षक धैर्यशील पाटील यांच्या गाडीवर दगडफेक केली. दरम्यान रविवारी नगर जिल्ह्यातील सराफ व्यापार्‍यांनी बंद पुकारला आहे.

close