देशाला टिव्हीवर दिसणारे नेते नको- मोदी

January 12, 2014 8:32 PM0 commentsViews: 666

modi in bhopal12 जानेवारी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर अत्यंत साध्यापध्दतीने राहत असले तरी ते दिल्लीचे मुख्यमंत्री नसल्याने त्यांच्याकडे प्रसारमाध्यमांचे लक्ष गेलेले नाही असा टोला मोदी यांची केजरीवाल यांना उद्देशून लगावला. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची आज गोव्यात विजय संकल्प रॅली होती. त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका तर केलीच पण त्यांच्या आजच्या भाषणावर आम आदमी पार्टीचा भरपूर प्रभाव होता. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या साधेपणावर मोदींनी भर दिला. तसंच देशाला टिव्हीवर दिसणारे नेते हवे की जमिनीवर काम करणारे, असा सवाल मोदींनी विचारून ‘आप’ला टोला लगावला.

याशिवाय मोदींनी काँग्रेस नेत्यांवरही जोरदार हल्ले चढवले. एकेकाळी देशाचे पंतप्रधान असूनही वाजपेयींच्या नावावर स्वत:चं घर नाही, असं मोदी म्हणाले. काँग्रेस ही भ्रष्टाचाराची विकृत प्रवृत्ती आहे. तिचं निर्मूलन केलंच पाहिजे, अशी जोरदार टीका मोदींनी केली. स्वातंत्र्यानंतरच्या ६० वर्षांच्या कारकिर्दीतील गेली १० वर्ष हा सर्वात वाईट काळ होता. वारंवार बेजबादार वक्तव्य करणारे काँग्रेसचे नेते निर्लज्ज झाले आहेत. त्यांना जनतेशी काहीही घेणदेण नाही अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसवर टीका केली.

इंडिया फर्स्ट हाच भाजपचा धर्म

स्वातंत्र्यानंतरच्या ६० वर्षांच्या कारकिर्दीतील गेली १० वर्ष हा सर्वात वाईट काळ होता. वारंवार बेजबादार वक्तव्य करणारे काँग्रेसचे नेते निर्लज्ज झाले आहेत. त्यांना जनतेशी काहीही घेणदेण नाही अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसवर टीका केली. सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पाठवतात. गुन्हेगाराला जात, धर्म नसते. पण देशाचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना केवळ जातीय राजकारणात रस आहे. त्यामुळेच त्यांनी मुस्लिम तरुणांना अटक करु नये अशा स्वरुपाचे पत्र सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पाठवले असावे असे मोदींनी सांगितले. या सर्व समस्यांना तुम्हाला आणखी थोडेच दिवस सामोरे जावे लागेल असे सांगत सत्तेत आल्यावर इंडिया फर्स्ट हाच भाजपचा धर्म असेल असेही मोदींनी नमूद केले.
दिल्लीत जयंती टॅक्स
तत्कालीन पर्यावरम मंत्री जयंती नटराजन यांच्यावर निशाणा साधताना मोदी म्हणाले, आजपर्यंत आपण विक्रीकर, आयकर, व्हॅट असे विविध कर ऐकली असली तरी दिल्लीत प्रकल्पांना मंजूरी मिळावी यासाठी जयंती टॅक्स भरावा लागतो. हा कर भरल्याशिवाय फाईल मंजूर होत नाही असा गंभीर आरोप भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी केला. भाजपचे सरकार आल्यावर पर्यावरणाचा समतोल राखून खाणप्रकल्पांना मंजूरी देऊ असे आश्वासनही मोदींनी दिले.
मी तर नेहमीच हरलो
चॅनलवर व वर्तमानपत्रांमध्ये मी नेहमीच हरलो. पण जनेतच्या ह्रदयात जागा मिळवण्यात मी विजयी झालो असा उल्लेख करत मोदी म्हणाले,टीव्हीवर झळकून काहीही साध्य होणार नसून जनतेला प्रत्यक्षात विकासाचा दृष्टीकोन असलेला नेता हवा आहे असे त्यांनी सांगितले.

 

close