‘कमवा आणि शिका’

January 12, 2014 8:47 PM0 commentsViews: 164

उदय जाधव, मुंबई
स्वामी विवेकानंद यांची आज 151वी जयंती आहे. स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा प्रसार आजची पिढी त्यांच्या हायटेक पद्धतीनं करतेय.याचबरोबर स्वावलंबनाचेही धडे गिरवत, कमवा आणि शिका या ध्येयानं अनेक विद्यार्थी विवेकानंदांच्या विचारांचा प्रसार करत आहेत. मुंबईतले गरजू विद्यार्थी विवेकानंदांच्या विचारांच्या प्रसाराबरोबरच शिक्षणासाठी चार पैसेही मिळवतायत.

समुद्र आणि विवेकानंदांचं नातं तसं निराळंच… याच समुद्राच्या साक्षीनं नव्या पिढीतले विद्यार्थी स्वामी विवेकानंदांचे विचार आचारणात आणण्याचे धडे गिरवताहेत… मुंबई सारख्या शहरात शिक्षण घेताना आर्थिक अडचणींचा सामना अनेक विद्यार्थ्यांना करावा लागतोय. त्यामुळे गरजू विद्यार्थी विवेकानंदांचे चित्र असलेले टी -शर्ट, त्यांच्या विचारांच्या प्रसारा बरोबरच विकण्याचा व्यवसाय करतात. त्यामुळं त्यांच्या शिक्षणाच्या खर्चाला हातभार लागत असल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे.

विवेकानंद यूथ कनेक्ट संस्थेचे संस्थापक डॉक्टर राजेश सर्वज्ञ यांनी यासाठी पुढाकार घेतलाय.

विवेकानंदांनी त्यांच्या तरुणपणी विचारांनी जग जिंकलं… त्यामुळं आजच्या तरुणांचे देखील विवेकानंद आयकॉन आहेत. त्यांचे विचार फक्त वाचण्यासाठी नसतात. तर प्रत्यक्षात आचरणात आणण्यासाठी असतात. हेच आजच्या पिढीनं दाखवून दिलंय.

close