टोलविरोधात आज कोल्हापूर बंद

January 13, 2014 9:15 AM0 commentsViews: 553

Kolhapur band213 जानेवारी :  कोल्हापुरातलं टोल आंदोलन चांगलंच चिघळलं आहे. टोलविरोधात शिवसेनेने पुकारलेल्या कोल्हापूर बंदला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सर्वपक्षीयांनी या बंदला पाठिंबा दिला आहे. रविवारी आंदोलनात सहभागी झालेल्या 1500 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात महापौरांसह 3 आमदारांचा समावेश आहे.

गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी काल IRBला टोलनाके बंद ठेवण्याच्या सूचना दिल्याची माहिती कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत दिली. बुधवारी टोलप्रश्नी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा होणार आहे, तर गुरूवारी कोल्हापूर महापालिकेची सर्वसाधारण सभा होणार आहे.

आयआरबीचे टोलचे सर्व पैसे महापालिकेकडन दिले जातील, असं आश्‍वासन कामगारमंत्री हसन मुश्रीफ आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिल्यानंतरही आयआरबी कंपनीनं रविवारी टोलवसुली सुरुच ठेवली होती. त्यामुळे संतप्त जमावाने 4 टोलनाक्यांची तोडफोड केली होती. या आंदोलकांवर जमावबंदी आदेश मोडल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या आंदोलनात सुमारे 16 लाखांचे नुकसान झाल्याची माहिती मिळते.

close