मेधा पाटकर ‘आप’मध्ये जाणार?

January 13, 2014 11:35 AM0 commentsViews: 428

13 जानेवारी :  ‘आप’ने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांना पक्षात येण्याचे निमंत्रण दिलंय. याबाबत मेधाताई काय निर्णय घेत आहेत याकडे सगळ्यांचे लक्षं लागले आहे. मेधाताई आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत. याआधी मेधाताईंनी काल मुंबईत आंदोलनातल्या विविध संघटना आणि कार्यकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी पक्षात जायचे की आंदोलनाची ओळख कायम ठेवून ‘आप’ला बाहेरून पाठिंबा द्यायचा यावर कार्यकर्त्यांनी विविध मतं व्यक्त केली आहेत.

close