हातेकर घेणार कँटीनच्या शेडमध्ये विद्यार्थ्यांचे वर्ग

January 13, 2014 1:58 PM0 commentsViews: 435

neeraj hatekar 413 जानेवारी : प्राध्यापक नीरज हातेकरांचे मुंबई विद्यापीठातून निलंबन करण्यात आलंय. मात्र अजूनही प्रा.हातेकर शिकवत असलेल्या विषयाला पर्यायी प्राध्यापकाची नेमणूक करण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी हातेकरांनाच शिकवण्याची विनंती केलीय. त्याला प्रा. नीरज हातेकर तयारी दाखवली आहे. ते उद्यापासून दुपारी 3 ते 5च्या दरम्यान विद्यापीठाच्या कँटीन शेडमध्ये शिकवणी घेणार आहेत.

दरम्यान, नीरज हातेकर यांना देशभरातून पाठिंबा मिळतोय. भारतातील ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ जगदीश भगवती यांनीही हातेकरांना पाठिंबा दिलाय. इतिहासकार रामचंद्र गुहा, दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे प्राध्यापक अनिर्बन कार यांनीही याआधी हातेकरांना पाठिंबा जाहीर केलाय. इतकंच नाही तर कोलंबिया आणि बोस्टन विद्यापीठासह देशातल्या महत्त्वाच्या विद्यापीठांमधले नामवंत प्राध्यापकही हातेकरांच्या पाठीशी आहेत. हातेकरांना पाठिंबा देणारे अर्थशास्त्रज्ञ आता थेट राष्ट्रपतींना पत्र लिहून हातेकरांचं निलंबन मागे घेण्याची विनंती करणार आहेत.

प्राध्यापक हातेकर यांना कुणी-कुणी पाठिंबा दिलाय ?

 • रामचंद्र गुहा – इतिहासकार
 • प्रा. अनिर्बन कार – दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स
 • डॉ. जगदीश भगवती – ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ
 • प्रा. दिलीप अबेरू – प्रिंस्टन विद्यापीठ
 • अभिजीत बॅनर्जी – मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
 • प्रा. अरविंद पंगारिया – कोलंबिया विद्यापीठ
 • प्रा. जॉन ड्रेझ – अलाहबाद विद्यापीठ
 • प्रणब बर्धन – कॅलिफोर्निया विद्यापीठ
 • सुजॉय चक्रवर्ती – जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्ली
 • मौसमी दास – दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स
 • अश्विनी देशपांडे – दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स
 • एस. महेंद्र देव – इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलमेंट रिसर्च
 • भास्कर दत्ता – वारविक युनिव्हर्सिटी
 • मैत्रीष घटक – लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स
 • परिक्षित घोष – दिल्ली स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स
 • दीप्ती गोयल – दिल्ली स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स
 • सुमीत गुलाटी – युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटीश कोलंबिया
 • मिलींद कंदलीकर – युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटीश कोलंबिया
 • रितीका(ऋतीका) खेरा – इंडियन इन्सिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दिल्ली
 • अशोक कोतवाल – युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटीश कोलंबिया
 • आमर्त्य लाहिरी – युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटीश कोलंबिया
 • निशा मल्होत्रा – युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटीश कोलंबिया
 • दिलीप मुखर्जी – बोस्टन युनिव्हर्सिटी
 • कार्तिक मुरलीधरन – युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, सॅन दियेगो
 • अरविंद पनगरिया – कोलंबिया युनिव्हर्सिटी
 • रोहिणी पांडे – हॉर्वर्ड युनिव्हर्सिटी
 • भारत रामास्वामी – न्युयॉर्क युनिव्हर्सिटी
 • देबराज रॉय – न्युयॉर्क युनिव्हर्सिटी
 • अरुणव सेन – इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट, दिल्ली
 • ईश्वरन सोमनाथन – इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट, दिल्ली
 • रोहिणी सोमनाथन – दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स

close