मेधा पाटकरांचा ‘आप’ला संपूर्ण पाठिंबा, प्रवेश वेटिंगवर

January 13, 2014 5:31 PM1 commentViews: 567

medha patkar aap13 जानेवारी : आम आदमी पार्टीची भुरळ सर्वांनाच पडत आहे. पत्रकारांपासून ते सामाजिक कार्यकर्ते आपमध्ये जाण्यास उत्सुक आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर आम आदमीत प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती मात्र ‘आप’च्या प्रवेशाचा प्रश्न पाटकर यांनी वेटिंगवर ठेवला आहे.

आज मेधा पाटकर यांनी आम आदमी पार्टीला संपूर्ण पाठिंबा जाहीर केलाय. पण, जनआंदोलनं सुरूच राहतील असंही मेधा पाटकर यांनी स्पष्ट केलंय. मेधा पाटकर ज्या जनआंदोलनांमध्ये सहभागी आहेत, त्यातल्या बहुतांश आंदोलनांचा ‘आप’ला पाठिंबा असल्याचं त्यांनी जाहीर केलं.

पण, हा पाठिंबा कसा असेल आंदोलनातले कार्यकर्ते ‘आप’चा फक्त प्रचार करतील की, उमेदवारही उभे करतील याबाबत अजून चर्चा व्हायची आहे, असं मेधा पाटकर यांनी सांगितलंय. त्यासाठी 16 आणि 17 जानेवारीला ‘आप’शी चर्चा होईल आणि त्यानंतर पुढची दिशा स्पष्ट होईल असंही मेधा पाटकर यांनी सांगितलंय. त्यामुळे मेधा पाटकर या आम आदमी पार्टीला फक्त समर्थन देतील की पक्षात सहभागी होतील, याबाबत अजून अस्पष्टता आहे. दरम्यान, ‘आप’ला पाठिंबा देण्याआधी अण्णा हजारेंशीही चर्चा केल्याचं मेधाताईंनी सांगितलंय.

  • aazaad hindustaani

    Welcome to AAP madam. CLEAN GOVERNANCE GUARANTEED.

close