लोकसभा निवडणुकीची घोषणा फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये ?

January 13, 2014 6:14 PM0 commentsViews: 887

Image img_184562_election_240x180.jpg13 जानेवारी : लोकसभा निवडणुकीची घोषणा फेब्रुवारीच्या शेवटी किंवा मार्चच्या सुरुवातीला करणार असल्याची माहिती आयबीएन नेटवर्कला निवडणूक आयोगाकडून मिळाली आहे. याआधीच्या म्हणजे 2009 च्या निवडणुका 5 टप्प्यांमध्ये झाल्या होत्या. त्यामुळे 2014 मध्येही लोकसभा निवडणुका 5 ते 6 टप्प्यांमध्ये होण्याची शक्यता आहे.

निवडणूक आयोगाने निवडणुकांच्या प्राथमिक तयारीला सुरुवात केली आहे. मात्र यात निवडणुकीचा खर्च सरकारनं करण्यास आयोगानं मंजुरी दिलेली नाही. निवडणूक आयोग फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात राजकीय पक्षांसोबत बैठक घेऊन निवडणुकांच्या तारखांबद्दल चर्चा करणार आहे. त्यानंतर फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात तारखांची घोषणा करण्याची शक्यता आहे.

तसंच प्रचाराच्या काळात राजकीय नेत्यांनी एकमेकांवर व्यक्तीगत टीका-टिप्पणी करू नये. नेत्यांनी संयम बाळगावा अशी भूमिका आयोगाने मांडली आहे. निवडणुकीच्या काळात पक्षांच्या फंडिंगच्या मुद्यावर आयोग एक प्रस्ताव तयार करत आहे. त्याचबरोबर निवडणुकीच्या काळात आचारसंहिता लागू झाल्यावर ओपनिंग पोलवर बंदी असावी असंही आयोगाचं म्हणणं आहे. तसंच राईट टू रिकॉलसाठी देश अजून तयार नाही त्यामुळे याबाबत काही भूमिका घेण्यास आयोग तयार नाही असंही स्पष्ट केलं.

close