बाळासाहेब ठाकरे प्रचारात उतरणार- खा.संजय राऊत

February 22, 2009 12:15 PM0 commentsViews: 33

22 फेब्रुवारी मुंबईअमेय तिरोडकरशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे लोकसभेच्या प्रचारात उतरणार आहेत. ही माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. शिवसेनेच्या ज्या महत्त्वाच्या जागा आहेत त्याठिकाणी बाळासाहेब स्वत: जाऊन सभा घेतील. तसंच काही ठिकाणी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमाद्वारे बाळासाहेबांची भाषण होतील. निवडणुकीच्या प्रचाराची बाळासाहेबांची स्वत:ची एक स्टाइल आहे त्यामुळे त्याचा फायदा प्रचारात होता. अशा ठिकाणच्या सभेला गर्दी होते. त्यामुळे जिथे अगदी अटीतटीची लढत आहे अशा ठिकाणी बाळासाहेबांच्या सभेमुळे मतदारावर परिणाम होऊ शकतो. बाळासाहेब ठाकरे निवडणूक प्रचारात उतरले तर त्याचा फायदा शिवसेना मिळेल हे मात्र निश्चित.असं असलं तरी प्रकृती सांभाळून बाळासाहेबांना हा प्रचार किती जमेल याची सगळ्यांना शंका आहे.

close