खा. समीर भुजबळ यांचं प्रगतीपुस्तक

January 13, 2014 9:18 PM0 commentsViews: 770

13 जानेवारी : आजपासून आपण राज्यातल्या खासदारांच्या मतदारसंघाचं प्रगतीपुस्तक तपासणार आहोत. त्यांनी त्याच्या मतदारसंघात किती काम केलं. मतदारांची त्याच्या कामावर काय प्रतिक्रिया आहे. विरोधकांनी खासदारावर काय आरोप केले आहेत. पाहणार आहोत खासदारांचा लेखाजोखामध्ये..राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या पालकत्वामुळे लक्षवेधी ठरला तो नाशिक लोकसभा मतदार संघ..भुजबळांचे पुतणे समीर भुजबळ यांचा राजकारण प्रवेश नाशिकचे खासदार म्हणून झाला..खासदार म्हणून समीर भुजबळांच्या या मतदारसंघात नाशिक शहरासह नाशिक जिल्ह्यातील काही तालुकेही येतात. रस्ते आणि पूल हे समीर भुजबळांच्या कारकिर्दीचं वैशिष्ट्य…मात्र हे रस्ते, हे पूल त्यांनी काकांच्या खात्यातूनच बांधले आणि ते आधीच मंजूरही झाले होते. हा विरोधकांचा त्यांच्यावरचा ठपका आहे.

 लेखोजोखा खासदारांचा -खासदार निधीचे प्रगतीपुस्तक

  • * खासदाराचे नाव – समीर भुजबळ
  • * मतदारसंघाचे नाव – नाशिक लोकसभा मतदारसंघ
  • * उपलब्ध निधी – 19 कोटी रुपये
  • * मंजूर निधी – 15.65 कोटी रुपये
  • * खर्च केलेला निधी – 10.75 कोटी रुपये
  • * खासदार निधीचा एकूण वापर – 90 %

सभागृहात विचारलेली प्रश्नसंख्या

  • * स्वतंत्रपणे: 14
  • * संयुक्तपणे: 6
  • * एकूण: 20

 

close