दाऊदच्या माणसाला वाचवण्यासाठी शिंदेंनी केले होते प्रयत्न -सिंग

January 13, 2014 10:15 PM0 commentsViews: 1855

rk singh413 जानेवारी : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला लवकरच भारतात आणणार अशी सिंह गर्जना करणारे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे अडचणीत सापडले आहे. दाऊद इब्राहिमच्या हस्तकाला संरक्षण देण्यासाठी शिंदे यांनी प्रयत्न केले असा गंभीर आरोप माजी केंद्रीय गृह सचिव आर. के. सिंग यांनी केला आहे.

इतकंच नाही तर सुशीलकुमार शिंदे नेहमी दिल्ली पोलिसांच्या कामात ढवळाढवळ करतात, आयपीएल मॅच फिक्सिंग प्रकरणामध्ये एका व्यावसायिकाची चौकशी करण्यापासून गृहमंत्र्यांनी दिल्ली पोलिसांना रोखलं असा आरोप त्यांनी सीएनएन आयबीएनला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

हा व्यावसायिक दाऊदचा हस्तक असल्याचा पोलिसांचा संशय आहे. विशेष म्हणजे आर. के. सिंग यांनी काहीच दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सिंग यांच्या आरोपामुळे काही प्रश्न उपस्थित होतं आहे. सिंग भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरच आरोप करून भाजपला दारुगोळा पुरवत आहेत का?, याबद्दल त्यांच्याकडे काही पुरावे आहे असा सवाल विचारला जात आहे.

महत्त्वाचे सवाल
– केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना लक्ष्य करून आर. के. सिंग भाजपला दारुगोळा पुरवत आहेत का?
– आर. के. सिंग जे आरोप करत आहेत त्याचे काही पुरावे त्यांच्याकडे आहेत का?
– शिंदे यांनी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या उद्योगपती मित्राला वाचवण्याचा खरंच प्रयत्न केला का?
– आर. के. सिंग असे आरोप करून स्वत:साठी लोकसभेचं तिकीट पक्क करत आहेत का?
– अशा आरोपांमुळे देशाच्या अंतर्गत सुरक्षेसारख्या गंभीर विषयाचं राजकारण होत नाही का?

close