पुणे शिक्षक मंडळाच्या बेंच खरेदीत गैरव्यवहार !

January 13, 2014 10:58 PM0 commentsViews: 193

pune bentch13 जानेवारी : पुण्यात शिक्षण मंडळ पुणेकरांच्या पैशांची उधळपट्टी करत असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. माहितीच्या अधिकाराअंतर्गत मिळालेल्या माहितीमधून ही बाब समोर आली आहे.

पावणेतीन कोटींमध्ये मिळणारे बेंच खरेदी करण्यासाठी शिक्षण मंडळ तब्बल सव्वाचार कोटी रुपये मोजत असल्याचा आरोप सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केला आहे. शिक्षण मंडळातर्फे शालेय स्टील फर्निचरची खरेदी करण्यासाठी निविदा काढल्या आहेत. हे टेंडर सव्वाचार कोटी रुपयांचे आहे.

खरं तर शिक्षण मंडळाने ही खरेदी करताना रेट कॉन्ट्रॅक्टचं पालन करणं गरजेचं होतं. पण ते बाजुला सारत या निविदा काढण्यात आल्या आहेत. इतकंच नाही तर रेट कॉन्ट्रॅक्टला बाजुला ठेवत लाकडी फर्निचरऐवजी स्टील फर्निचर खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पुणेकरांचे पैसे पाण्यात घालवण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप होतोय. पण शिक्षण मंडळाचे अध्यक्ष रवी चौधरी यांनी मात्र हे आरोप खोडून काढले आहेत.

close