खंडाळ्याजवळ भीषण अपघातात 9 जण ठार

January 14, 2014 8:45 AM0 commentsViews: 1126

satara accident14 जानेवारी : सातारा जिल्ह्यातल्या पुणे-बंगळुरू महामार्गावर खंडाळाजवळं काल रात्री भीषण अपघात झाला.या अपघातात 9 जण ठार झालेत तर पाच जण जबर जखमी झाले आहेत.

क्रूझर गाडीवर कंटेनर पलटल्यामुळे हा भीषण अपघात झाला. या क्रूझरमध्ये 13 प्रवासी प्रवास करत होते. हा अपघात इतका भीषण होता की, क्रूझरचा चेंदामेंदा होऊन 9 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. उरलेले पाच जणं गंभीर जखमी झालेत.

जखमींवर शिरवळच्या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये 7 पुरूष ,एक महिला आणि एका लहान बाळाचा समावेश आहे.

close