महायुतीची आज महत्त्वाची बैठक

January 14, 2014 9:21 AM0 commentsViews: 842

78 mahayuti and sa14 जानेवारी : लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना, भाजप, रिपाइं आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना या महायुतीच्या जागावाटपाची बैठक आज होणार आहे. शिवसेना महायुतीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा समावेश झाल्यानंतर कोणाला किती आणि कुठल्या जागा सोडाव्या लागणार, याविषयी आजच्या बैठकीत चर्चा होईल. या बैठकीला उद्धव ठाकरे, गोपीनाथ मुंडे, देवेंद्र फडणवीस, राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, रामदास आठवले, सुभाष देसाई यासह समन्वय समितीचे 14 सदस्य उपस्थित राहणार आहेत.

रिपाइंला किती जागा द्याव्या आणि त्या कोणाच्या कोट्यातून द्यावा याविषयी आजच्या बैठकीत चर्चा होणार आहे. शिवसेना-भाजपमध्ये असलेल्या 26-22 च्या फॉर्म्युलातील शिवसेनेच्या कोट्यातली हातकणंगले, तर भाजपच्या कोट्यातली माढ्याची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मिळू शकते. त्यामुळे राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर हे देखील आजच्या बैठकीला हजर राहणार आहेत. त्यांनीही माढ्याच्या जागेवर दावा केल्यामुळे माढ्याची जागा स्वाभिमानीला की जानकर यांना याविषयी सगळ्यांनाच उत्सुकता आहे.

close