पायरेटेड सीडींची ‘मनचिसे’कडून होळी

January 14, 2014 12:04 PM0 commentsViews: 1337

timepass14 जानेवारी : मराठी चित्रपट टाइमपास आणि हिंदी चित्रपट धूम 3 यांना मिळणारा प्रतिसाद पाहता तसेच धूम 3 व इतर चित्रपटांच्या पायरेटेड सीडी खुलेआम विकल्या जात आहेत.

 

मुलुंडमध्ये खुलेआम विकल्या जाणार्‍या या पायरेटेड सीडींवर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेच्या कार्यकत्यांनी धाड घातली व हजारो सीडीज जाळून टाकल्या.
टाइमपास या मराठी चित्रपटाने आतापर्यंत बारा कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवलेला आहे. पण पायरसी होत असताना पोलिसांकडे तक्रार करूनही ते काहीच कारवाई करत नसल्यामुळे मनचिसेने पुढाकार घेऊन हे काम केलं असं मनसे चित्रपट सेनेच्या सचिन चव्हाण यांनी सांगितले आहे.

close