कौल जनतेचा: सरकार स्थापन करताना महिलांची भूमिका महत्त्वाची

February 22, 2009 12:59 PM0 commentsViews: 5

22 फेब्रुवारी येत्या लोकसभा निवडणुकीत,सरकार स्थापन करताना महिलांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.या महिला आहेत जयललिता,मायावती आणि ममता बॅनर्जी.युपीए असो वा एनडीए यांच्या मदतीशिवाय सरकार स्थापन करता येणार नाही.येत्या लोकसभा निवडणुकीत प्रादेशिक पक्षांची कामगिरी महत्त्वाची ठरणार आहे.त्यामुळे निवडणूकपूर्व राष्ट्रीयपक्ष कुणाशी मैत्री करतात हे महत्त्वाचं ठरणार आहे.सीएसडीएस आणि आयबीएन नेटवर्कच्या सर्व्हेनुसार उत्तरप्रदेशमध्ये समाजवादी पार्टीसोबतची निवडणूकपूर्व युती महत्त्वाची ठरू शकते.तर कर्नाटकमध्ये येडीयुरप्पांचा प्रभाव कमी करण्यासाठी,काँग्रेसनं धर्मनिरपेक्ष जनता दलाशी मैत्री करणं फायद्याचं ठरू शकतंअसं सर्व्हेतून दिसून आलंय. तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीच्या तृणमूल काँग्रेसशी केलेली मैत्री लाभदायक ठरू शकते.युपीएल डाव्या पक्षांची मदत घ्यावी लागली तर डावेपक्ष यावेळी आणखी कठीण अटी ठेवण्याची शक्यता आहे.जयललिता यांनी तामिळनाडूमध्ये अपेक्षनुसार कामगिरी करणं, युपीएसाठी आवश्यक आहे.कारण मुलायम,ममता आणि मायावतींना बरोबर घेताना काँग्रेसला तारेवरची कसरत करावी लागेलं.युपीएपुढे जेवढी आव्हानं त्याहून जास्त आव्हानं एनडीएपुढे आहेत. सर्व्हेनुसार एनडीएला 185 च्या जवळपास जागा मिळू शकतात.निवडणुकीनंतर मायावती,ममता किंवा जयललिता यांना एनडीए आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करू शकते. त्याबरोबरचं चंद्राबाबू नायडूही त्यांच्यासाठी एक ऑप्शन आहे.पण सध्यातरी हे सगळं कठीणचं वाटतंय.पण एनडीएननं दोनशे जागांचा टप्पा पार केला.तर त्यांचं आव्हानं सोप होणार आहे. त्यांना फक्त मायावती आणि जयललीता यांची मन वळवावी लागतील.सीएसडीएस-आयबीएनच्या सर्व्हेतून आणखी एक शक्यता पुढं आली आहे.ती म्हणजे मायावती यांची बहुजन समाज पार्टी 50 जागा घेऊ शकते.त्या स्थितीत एनडीए आणि युपीएकडे दोनशेपेक्षा कमी जागा असतीलं.आणि पुन्हा एकदा त्रिशंकू परिस्थिती निर्माण होईल.

close