मोदींच्या नशिबात जे असले ते मिळावं -सलमान

January 14, 2014 5:20 PM1 commentViews: 1338

salman modi14 जानेवारी : बॉलीवूडचा सुपरस्टार दंबग सलमान खान आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी ‘काय पो छे..’म्हणत पतंगमहोत्सवाचा आनंद लुटला. पण मोदींची ‘जय हो’ म्हणण्यास सलमानने टाळलं. गुजरातच्या जनतेसाठी मोदी बेस्ट मॅन आहे तर माझ्यासाठी मुंबईत प्रिया दत्त आणि बाबा सिद्दिकी आहे मी त्यांना मत देईन तुम्ही मोदींना मत द्या अशी ‘पतंगबाजी’ सलमानने आपल्या स्टाईलने केली.

सलमान खान मंगळवारी आपल्या आगामी सिनेमा ‘जय हो’च्या प्रमोशनसाठी गुजरातमध्ये आला होता. यावेळी सलमानने अहमदाबाद इथं नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली. नरेंद्र मोदींनी सलमानच्या पाहुणचारात कोणतीही कसर सोडली नाही. मोदी आणि सलमान यांनी दुपारी एकत्र जेवण करून पतंग उडवण्याचा आनंद लुटला. यावेळी सलमानने पत्रकारांशी संवाद साधला. नरेंद्र मोदी हे चांगले व्यक्तीमत्व असून ते माझे गुडमॅन आहे. त्यांच्या नशिबात जे काही आहे ते त्यांना मिळावं अशी स्तुतीसुमनं सलमानने उधळली.

तसंच येणार्‍या निवडणुकीत जनतेने देशातील सर्वोत्कृष्ट व्यक्तीला पंतप्रधानपदासाठी निवडावे. मी मुंबईत वांद्रे इथं राहतो त्यामुळे तिथे प्रिया दत्त आणि बाबा सिद्दिकी आहेत मी त्यांना मत देईन. गुजरातच्या जनतेसाठी नरेंद्र मोदी हे बेस्ट आहे त्यांनी मोदींना मत द्यावं अशी पतंग उडवतं मोदींची जय हो म्हणण्यास सलमानने टाळलं. सलमानला पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती. विशेष म्हणजे ‘जय हो’च्या प्रमोशनसाठी सलमान या अगोदर मध्यप्रदेशमध्ये गेला होता. तेव्हा त्याने मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांचं तोंडभरुन कौतुक केलं होतं. मात्र आज गुजरातमध्ये मोदींबाबत बोलताना सलमानने सावध प्रतिक्रिया दिली.

  • namuchi

    अगदी बरोबर सलमान…दैत्य मोडीला साबरमती जेलची हवा खायला लागणार हेच त्याचे नशीब आहे…

close