मांज्याने गळा चिरून तरुणाचा मृत्यू

January 14, 2014 2:28 PM0 commentsViews: 685

manja14 जानेवारी : आज मकरसंक्रातीच्या दिनी देशभरात पतंग उडवण्याची धूम सुरू आहे पण नागपूरमध्ये म्हाळगीनगर भागात पतंगाच्या मांज्याने गळा चिरुन राहुल नागपुरे (वय 26) या तरुणाचा मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली.

राहुल नागपुरे सकाळी आपल्या दुचाकीवरुन एमआयडीसीत कामावर जात असताना पतंगाचा मांज्या गळ्यात अडकला यात त्याचा गळा चिरला गेला आणि जागीच मृत्यू झाला. नागपुरात गेल्या काही दिवसांपासून पतंगाच्या मांज्यामुळे लोक जखमी होत असल्याच्या घटना घडल्या आहेत.

मागील वर्षीही एका चिमुरड्याचा मांज्यामुळे बळी गेला होता. सुरुवातीला पतंग उडवण्यासाठी खडीचे मांजे वापरली जात होती पण अलीकडे मांज्यामध्ये चायनिझ नायलॉनचे मांजे अधिक प्रमाणावर वापरले जात आहे. या मांज्यामुळे पक्षी तर जखमी होतातच पण या मांज्याने आज एका तरुणांचा नाहक बळी घेतलाय.

close