युती सरकार आल्यावर राज्य टोलमुक्त करू -मुंडे

January 14, 2014 8:21 PM1 commentViews: 1031

munde on sharad pawar14 जानेवारी : कोल्हापुरात झालेल्या टोलविरोधी आंदोलनाची दखल राजकीय पक्षांनाही घ्यायला लागलीये. मंगळवारी झालेल्या महायुतीच्या बैठकीनंतर त्याचा प्रत्यय आला. महायुती सत्तेत आली तर महाराष्ट्र टोलमुक्त करू असं आश्वासन भाजपचे लोकसभेतील उपनेते गोपीनाथ मुंडे यांनी दिलं.

इतकंच नाही, तर दिल्लीमधल्या आम आदमी पार्टीच्या सरकारचं अनुकरण करत वीजेचे दर पन्नास टक्क्यांनी कमी करण्याचं आश्वासनही यावेळी देण्यात आलं. संध्याकाळी महायुतीची बैठक झाली. यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

याबैठकीत आज जागावाटपासाठी चर्चा झाली. मात्र कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्याऐवजी 5 जणांची समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, गोपीनाथ मुंडे, रामदास आठवले, राजू शेट्टी आणि महादेव जानकर यांचा या समितीमध्ये समावेश करण्यात आलाय.

तसंच 30 जानेवारीला इचलकरंजीत महामेळावा घेण्याचा आणि 25 फेब्रुवारीला मुंबईत महामोर्चा काढण्याचाही निर्णय घेण्यात आला. आपल्याला महायुतीमध्ये नक्की जागा मिळेल असा विश्वास रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केला, तर मित्रपक्षांना पश्चात्ताप होऊ देणार नाही असं आश्वासन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलं.

  • Ramesh Sirsath

    Khotarde sale !!!! Sarve Rajkarni aasech aahe . Nivduki aagodar manat yeil ti laluch dakhavata nantar sarve aalbel. Kunavar vishwas thevava hech kalat nai .

close